आपले आमच्यासोबत अतूट नाते…. आपल्या विश्वासामुळेच ग्राहक सेवेची यशस्वी 26 वर्ष. आपण बँकेच्या प्रगतीसाठी दिलेली मोलाची साथ याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. ऋणात राहू इच्छितो .बँक राबवित असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी सभासद,हितचिंतक, खातेदार वेळोवेळी सहकार्य करीत असतात हीच आमची ऊर्जा आहे. वेगाने बदलणाऱ्या ग्राहकांच्या गरजा आणि सुविधा लक्षात घेता बँकेच्या कामकाजाबाबत किंवा सेवा सुविधांसंदर्भात आपल्या काही सूचना अथवा तक्रारी असल्यास आपण बँकेच्या वेबसाईटवर टाकू शकतात त्याचे तातडीने निरसन करण्यात येईल.आपले समाधान हाच आमचा आनंद आहे. आपले नाते चिरंतन व आपुलकीचे….
आपल्या सूचनांचे स्वागत.
– प्रसाद विजय पाटील
( मुख्य कार्यकारी अधिकारी – विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिक)
आपली काही तक्रार किंवा सूचना असल्यास कृपया admindept@vishwasbank.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा अथवा खाली दिलेल्या चॅट बटणवर क्लीक करून फॉर्म भरून दिल्यास बँकेचे अधिकारी आपल्याशी लवकरात लवकर संपर्क साधतील.
लेव्हल | संबंधित व्यक्ती | तक्रार निवारण कालावधी |
---|---|---|
लेव्हल 1 | वरिष्ठ व्यवस्थापक, प्रशासन विभाग | 24 तास |
लेव्हल 2 | सह मुख्य कार्यकारी अधिकारी/ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी | 24 तास |
लेव्हल 3 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 24 तास |
लेव्हल 4 | अध्यक्ष | 24 तास |